‘या’ अभिनेत्रीने ६ महिन्यांसाठी गमावली होती स्मृती

मुंबई : चित्रपटांमध्ये अनेकवेळा ऍक्शन सीन्ससाठी बॉडी डबलचा उपयोग केला जातो. परंतु, इंडस्ट्रीत अनेक असे ऍक्टर्स आहेत जे स्वतः स्टंट आणि ऍक्शन सीन्स करतात. यातच दिशा पाटणीचेही नाव येते. दिशाच्या फिटनेस फ्रिकबाबत सर्वांनाच माहित आहे. दिशाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर समरसॉल्ट, बाफलिंग, मिक्स्ड मार्शल आणि जिम्नॅस्टिक अनेक व्हिडीओ आहेत.

दिशाला स्टंट आणि ऍक्शन सीन्ससाठी स्वतः करायला आवडतात. परंतु, यामुळे दिशाला स्मृतिभ्रंश झाला होता. ६ महिन्यांसाठी तिने आपल्या स्मृती गमावल्या होत्या. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना दिशाने या घटनेबद्दल सांगितले होते.

दिशा म्हणाली कि, एकदा काँक्रीट फ्लोअरवर रिहर्सल करत होते आणि त्याचवेळी मी डोक्यावर पडले. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. व ६ महिन्यासाठी मी माझ्या स्मृती गमावल्या होत्या. त्या अपघातामुळे मी आयुष्याचे ६ महिने गमावले.

ती पुढे म्हणाली कि, आता मी शुटींग करताना खूप काळजी घेते. आणि जेव्हा शूटिंग नसते. त्यावेळी आपल्या ट्रेनरसोबत जिम्नॅस्टिक आणि मिक्स्ड मार्शल आटर्सचे प्रशिक्षण घेते. आज मी जे काही आहे ते जिम्नॅस्टिक आणि मिक्स्ड मार्शल आटर्समुळेच. त्यामुळे मी या दोन्हीची सतत प्रॅक्टिस करत असते, असे दिशाने म्हंटले होते.

दरम्यान, दिशा पाटणीने ‘लोफर’ या दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तर ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. दिशाच्या वर्कफ्रन्टबाबत बोलायचे झाल्यास दिशा नुकतीच सलमान खानसोबत ‘राधे: युआर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटात झळकली होती. आगामी काळात एकता कपूरच्या ‘केटीना’मध्ये दिशा पाटणी दिसणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.