वॉशिंग्टन – करोना व्हायरसमुळे जागतिक पातळीवर मंदी निर्माण झाली आहे. या मंदीची तीव्रता 1930 मध्ये निर्माण झालेल्या मंदीइतकी आहे, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.
जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी सांगितले की, या मंदीचा गरीब देशावर भयंकर परिणाम झाला आहे. या मंदीमुळे सर्व देशांच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.
गरीब देशातील गरिबी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर जागतिक बॅंक व नाणेनिधी विचार करणार असल्याचे ते म्हणाले.
बॅंकेने करोनावर लस विकसित करण्यासाठी व वितरित करण्यासाठी 12 अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध केला आहे.