फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान

कोल्हापूर: फोर्टिस हॉस्पिटल या महाराष्ट्रातील आघाडीच्या हॉस्पिटलने आज येथे जगातील सर्वात प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान “दा विन्सी दळ रोबोटिक सर्जिकल’ यंत्रणा स्थापित केली आहे. फोर-आर्म सर्जिकल रोबोटिक यंत्रणा युरोलॉजी, ऑन्कोलॉजी, ग्यानेकॉलॉजी, डोके व मान आणि जठर व आतड्यांसबंधीच्या शस्त्रक्रियांच्या स्पेशालिटीजसाठी वापरण्यात येईल.

फोर्टिस हॉस्पिटलच्या विभागीय संचालिका डॉ. एस नारायणी, मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार आणि कोलोरेक्‍टल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अनिल हेरूर आणि मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या युरोलॉजीचे प्रमुख डॉ. पंकज महेश्‍वरी यांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रिया यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले.

डॉक्‍टरांना अत्यंत उपयोगी असलेली नवीन दा विन्सी दळ यंत्रणा डॉक्‍टरांना अगदी अचूकपणे शस्त्रक्रिया करण्यामध्ये मदत करते आणि यामुळे आसपासच्या ऊतींना अत्यंत कमी प्रमाणात इजा होते. ही यंत्रणा कुशल सर्जन्सना जटिल शस्त्रक्रिया करताना साह्य म्हणून प्रगत तंत्रज्ञानाची सुविधा देईल. अत्यंत अचूकपणे शस्त्रक्रिया करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया यंत्रणा प्रशिक्षित सर्जन्सच्या स्पेशालाइज टीमद्वारे संचालित असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)