तब्बल 180 चौरस किलोमीटर क्षेत्रात वनस्पतीचा विस्तार
सिडनी : ऑस्ट्रियातील शार्क बे या समुद्राच्या तळाशी जे समुद्री गवत आढळते ते गवत प्रत्यक्ष एक मोठी वनस्पती असून या वनस्पतीचा विस्तार तब्बल 180 चौरस किलोमीटर क्षेत्रात झाल्याची माहिती उघड झाली झाली आहे. समुद्राच्या तळाशी सापडणारे हे गवत म्हणजे वेगवेगळी वनस्पती असावी असे मानले जात होते पण आता नवीन झालेल्या संशोधनाप्रमाणे हे गवत नसून एकच मोठी वनस्पती आहे.
सुमारे चार हजार पाचशे वर्षांपूर्वी या वनस्पतीचे बी रोवले गेले होते त्यामधूनच ही वनस्पती विकसित झाली असून आता तब्बल 180 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये ती पसरली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतील काही संशोधक शार्क बे समुद्रात सापडणाऱ्या या वनस्पतीचा शोध घेण्यासाठी समुद्रात उतरले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.
या टीमचे नेतृत्व करणारे डॉक्टर जेन एडबोलो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, समुद्राच्या तळाशी सापडणाऱ्या गवताचा अभ्यास सुरू असतानाच जेव्हा त्यांच्या डीएनएचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा हे एक गवत म्हणजे एक प्रचंड मोठी अशी वनस्पती असल्याचे लक्षात आले. 180 चौरस किलोमीटर क्षेत्रांमध्ये जीवशास्त्रीय परिस्थिती आणि तापमान परिस्थिती भिन्न असूनही सर्वत्र ही वनस्पती उगवली आहे.
या वनस्पतीला कोणत्याही प्रकारची फळे किंवा फुले येताना दिसत नाहीत पण एखाद्या गवताप्रमाणे त्याची वाढ होताना दिसत आहे. शार्क बे समुद्र क्षेत्रामध्ये अशा अनेक चित्रविचित्र गोष्टी आढळतात. संशोधकांसाठी हे समुद्र क्षेत्र नेहमीच आकर्षणाचे केंद्र झाले आहे आणि आता मोठ्या प्रमाणात सापडलेली ही एकच वनस्पती संशोधकांसाठी एक संशोधनाचा महत्त्वाचा विषय झाली आहे. या वनस्पतीवर आगामी काळात आणखी काही संशोधन केले जाण्याची शक्यता आहे.