ट्रेंटन, (न्यू जर्सी) – अमेरिकेतील डॉक्टरांच्या एका टीमने चमत्कारच घडवला आहे. प्रथमच मानवी चेहरा आणि दोन्ही हातांचे यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केले आहे. यूएसमधील न्यू जर्सी येथे डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या चेहऱ्याचे आणि हातांचे ट्रान्सप्लांट केले.
एका कार अपघातात जो डिमियो या नावाच्या व्यक्तीचे शरीर 80 टक्क्यांपर्यंत भाजले होते. जो डिमियो याने तब्बल 6 महिने चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर पापण्यांची उघडझाप केली आणि चुटकी वाजवली.
जो डिमियो 2018 साली ड्यूटी संपवून रात्री घरी परतत होता. तो कार चालवत असताना त्याला झोप लागली आणि हा अपघात घडला. या अपघातामुळे कारला आग लागली. त्याचे दैव बलवत्तर म्हणून आजूबाजूला असलेल्या लोकांनी वेळीच सावध होऊन त्याचा जीव वाचवला. मात्र जो डिमिडो याचा चेहरा पूर्णपणे भाजला होता. या अपघातात त्याने आपले दोन्ही हात गमावले. अपघातानंतर तो दोन महिने कोमात होता.
आता ट्रान्सप्लांटनंतर जो डिमिडो याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
मागील वर्षी 9 ऑगस्टला डिमियोला मॅच डोनर मिळला होता. मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑपेरशन करण्यात आले नाही.
ही सर्जरी यशस्वी होण्याची शक्यता केवळ 6 टक्के होती. हे ऑपरेशन करण्यास डॉक्टरांच्या टीमने 23 तास अथक प्रयत्न केले आणि जगात पहिल्यांदाच चेहरा आणि हाताचे ट्रान्सप्लांट यशस्वी केले.