नवी दिल्ली – दिल्ली सरकारला कोविड स्पेशल ट्रेन देण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये जगातील पहिले कोविड रुग्णालय तयार होणार आहे. ही ट्रेन दिल्लीतील शकूर वस्ती वाशिंग यार्डात उभी करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकारी आणि डॉक्टरांनी या रेल्वेगाडीचे निरीक्षण केले आहे.
बुधवारपासून दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाची टीम या ट्रेनमध्ये तैनात केली जाईल. उपचारासाठी व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणांनी हे ट्रेन कोविड रुग्णालय सज्ज असणार आहे. गुरुवारी ट्रेनमध्ये कोविड रुग्णालय पूर्णपणे तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या ट्रेनला पूर्णपणे आयसोलेटेड जागी ठेवले आहे. ट्रेनमध्ये मेडिकल स्टाफ आणि डॉक्टरांसाठी तीन वातानुकूलित कोच बनवण्यात आले आहेत. रुग्णांसाठी दहा स्लीपर डब्बे मिळून आयसोलेशन कोच बनवण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून एका कोचमध्ये 16 रुग्ण ठेवण्यात येतील. लवकरच 10 कोचची आणखी एक कोविड ट्रेन तयार केली जाणार आहे.