नवी दिल्ली – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये अडकून पडले आहेत. काहींच्या बाबतीत ते एक व्यसनच झाले आहे. मात्र, एका दृष्टीने पहिले तर आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. जर तुम्ही सुद्धा नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर खालील बातमी नक्की वाचा…
नुकतंच रियलमी (Realme) या नामांकित कंपनीने आपला नवीन शानदार ‘Realme V3’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme V3 ची खासियत म्हणजे हा जगातला सर्वात स्वस्त 5जी मोबाईल आहे. Realme V3 ला 6.5 इंचचा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोबाईल तीन वेरियंटमध्ये मिळत आहे.
तसेच उत्तम फोटोग्राफीसाठी Realme V3 फोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप लावलेला आहे. ज्यामध्ये फोनचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सल असून, दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल मॅक्रो तर तिसरा 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
Realme V3 मोबाईल ची 6GB + 64GB स्टोरेजची किंमत 10,700 रुपये, 6GB + 128 GB वेरियंटची किंमत 15,000 रुपये, तर 8GB + 128 GB वेरियंटची किंमत 17,100 रुपये एवढी आहे. याचा अर्थ पहिल्या वेरियंटमध्ये हा जगातील सर्वात स्वस्त फोन ठरतोय. सध्या हा फोन तीन कलर्स मध्ये उपलब्ध आहे.
दरम्यान, हा एक दमदार 5जी फोन असून, Realme V3 फोन भारतात लाँच केला जाईल की नाही हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही.