याद करेगी दुनिया तेरा मेरा याराना! कुटुंबियांनी पाठ फिरवल्याने मुस्लिम मित्राने दिली मुखाग्नि!

मित्राचा झाला होता कोरोनामुळे मृत्यू; ४०० किमीचे अंतर पार करत अंत्यसंस्कारासाठी आला मित्र

नवी दिल्ली: मैत्रीचे नाते जगातील कोणत्याही नात्यापेक्षा प्रामाणिक असते असे म्हटले जाते. आयुष्यभर साथ देणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राची आयुष्याच्या शेवटी देखील साथ दिली. कुटुंबीयांनी अशा वळणावर साथ सोडली जिथे त्यांची जास्त गरज होती. पण अखेर मैत्रीचं कमी आली आणि मित्र पंचत्वात विलीन झाला.

यूपीच्या इटावातील एक मुस्लिम व्यक्तीने हिंदू मित्रासोबत त्याच्या मृत्यूनंतरही मैत्री निभावली. या मित्राचं उदाहरण प्रत्येकजण देत आहे. हिंदू मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि नातेवाईकांनी पाठ फिरवली. तेव्हा मुस्लिम मित्र ४०० किलोमीटर अंतराहून आला आणि त्याने मित्राला मुखाग्नि देऊन अंत्यसंस्कार केला.

रिपोर्टनुसार, प्रयागराजच्या जयंतीपूर भागात हेम सिंह हे एकटे राहत होते. त्यांच्या मुलीचं आणि पत्नीचं निधन काही वर्षांआधीच झालं होतं. ते हायकोर्टात ज्वाइंट रजिस्ट्रार होते. एक आठवड्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी आपला मित्र सिराज यांना फोन करून कोरोना झाल्याची माहिती दिली.

तब्येत जास्त बिघडल्याने हेम सिंह यांना प्रयागराजच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलने दोन लाख रूपये जमा करण्यास सांगितले होते. तेव्हा सिराज यांनी आपल्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी हेम सिंह यांचे निधन झाले. हेम सिंह यांच्या निधनाची माहिती मिळताच सिराज ४०० किमीचा प्रवास करून रात्री उशीरा तिथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी सिराज यांनी एक एक करून हेम सिंह यांच्या २० नातेवाईकांना फोन केले. मात्र, कुणीही त्यांना खांदा देण्यासाठी तयार झाले नाही. त्यानंतर सिराज हे मित्र हेम सिंहचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांनी अंत्यसंस्कार केले.

हेम सिंहचे जवळचे अधिवक्ता बशारत अली खान यांच्यानुसार, हेम सिंह यांचं लग्न माजी डीजीपी आनंद लाल बॅनर्जी यांच्या बहिणीसोबत झालं होतं. त्या सुद्धा हायकोर्टात असिस्ंटट रजिस्ट्रार होत्या. दीड वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.