नवीन भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीवर जगाला अभिमान असेल- पंतप्रधान 

फ्रांस: पंतप्रधान मोदींनी फ्रान्समधील भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. ‘भारतासोबत असलेले तुमचे संबंध मातीचे आणि फ्रान्सबरोबर कठोर परिश्रमाचे आहेत. आजकाल सर्व जण राम भक्तीमध्ये मग्न आहे.  भारत आणि फ्रान्समधील मैत्री अतूट आहे. ही मैत्री नवीन नसून खूप वर्ष जुनी आहे. प्रत्येक परिस्थितीत दोन्ही देश एकत्र आले आहेत. परस्पर कर्तृत्वावर आम्ही आनंदी आहोत.

पंतप्रधान म्हणाले, ‘फ्रेंच फुटबॉल संघाचे अनेक चाहते भारतात आहेत. भारताने बँक खाती उघडण्यात विक्रम केला आहे. आज नवीन भारतात भ्रष्टाचार, कौटुंबिकवाद, जनतेच्या पैशाची लूट, दहशतवाद नियंत्रित केले जात आहेत. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. नवीन भारतात थकून थांबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

‘जेव्हा मी ४ वर्षांपूर्वी फ्रान्सला आलो होतो तेव्हा हजारो भारतीयांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. मला आठवते जेव्हा मी तुम्हाला वचन दिले होते.  भारत नव्या आशा आणि आकांक्षाच्या प्रवासावर जाणार आहे. आज मी सांगू इच्छितो आम्ही केवळ त्या प्रवासाला सुरुवात केली नाही, तर १३० कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नाने भारत वेगाने प्रगतीच्या मार्गावर जात आहे. त्यामुळेच भारतातील जनतेने आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला असल्याचे मोदी म्हणाले.

‘हा विश्वास फक्त सरकार चालवण्यासाठी नाही तर नवीन भारत घडविण्यासाठी आहे. एक नवीन भारतच्या समृद्ध सभ्यता आणि संस्कृतीवर संपूर्ण जगाला अभिमान असेल. आणि एकविसाव्या शतकात तो नेतृत्व करू शकेल. एक नवीन भारत ज्यांचे लक्ष व्यवसाय करण्याच्या सुलभतेवर असेल. जे जगण्याची सोय देखील सुनिश्चित करेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×