बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही अभिनेत्री फ्रिडा पिंटोने दमदार अभिनयाने चाहत्यांवर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. अभिनेत्री फ्रिडा पिंटोच्या मते, ऍनिमेटेड प्रोजेक्टवर काम करणे खूप वेगळं आहे.
कारण यासाठी रेकॉर्डिंग करताना प्रथम आपली कल्पनाशक्ती वाढवणे आवश्यक आहे. ती म्हणते की, जेव्हा कलाकार त्याच्या सर्व संकोचांना बाजूला ठेवतो, तेव्हाच कलाकार त्याच्या चरित्रात पूर्णपणे फिट बसू शकतो.
फ्रिडा म्हणते, ऍनिमेशनची दुनिया चित्रपट आणि टेलीव्हिजनपेक्षा खूप वेगळी आहे. रेकॉर्डिंग करताना आपल्याला प्रथम आपली कल्पनाशक्ती वाढवावी लागते. परंतु त्याचबरोबर कलाकाराला पात्र साकारण्यासाठी सर्व प्रकारच्या संकोचातून बाहेर पडावे लागते.
फ्रिडा सध्या “मीरा, रॉयल डिटेक्टिव्ह’ या ऍनिमेटेड मालिकेत काम करत आहे. जी भारतीय संस्कृती आणि परंपरावर आधारित आहे. या मालिकेत तिच्यासोबत जमीला जमील, कल पेन, हन्ना सिमोन, उत्कर्ष अंबुडकर, आसिफ मांडवी आदी दक्षिण आशियातील अनेक प्रसिद्ध कलाकार भूमिका साकारत आहेत.
दरम्यान, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या फ्रिडाने 2008च्या ऑस्कर जिंकणा-या “स्लमडॉग मिलियनेअर’ चित्रपटातून जगभरात प्रसिद्धी मिळविली होती.