अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राला हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 27 वर्षें झाली आहेत. शिल्पाच्या मते,स्टारडम सहजतेने मिळत नाही, पण योग्य दिशेने प्रयत्न केला तर कोणीही यशस्वी होऊ शकते. एक मुलाखतीत शिल्पा म्हणाली, जगात कुठेही काही फुकट मिळत नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे फायदे-तोटे दोन्हीही आहेत. परंतु माझ्या बाबतीत फायदे जास्त होत असल्याने मी आनंदी आहे.
शिल्पाने 1993 मध्ये “बाजीगर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर तिने बरेच हिट चित्रपट दिले आहेत. शिल्पाने टेलिव्हिजनवरही आपले नशिब आजमावले आहे. 2007 मध्ये ती यूकेमध्ये “सेलिब्रिटी बिग ब्रदर’ ठरली होती. त्यानंतर ती “बिग बॉस’च्या सीझन टूमध्ये होस्टिंग करताना दिसला. अभिनेत्रीने “जरा नाच दिखा’, “नच बलिये’ आणि “सुपर डान्सर’ यासारख्या रिऍलिटी शोजमध्येही जजची भूमिका साकारली आहे.
तुला आणखी काय करण्याची आकांक्षा आहे? यावर ती म्हणाले, “अजून बरेच काही करण्याची व साध्य करण्याची गरज आहे. काळ बदलला आहे, अनुभव एक चांगला शिक्षक आहे आणि कलाकारांना अधिक चांगले करतो. मी लोकांकडून माझ्या प्रतिभेची नवीन आणि चांगली बाजू पाहण्यास उत्सुक आहे, असे शिल्पा म्हणाली.