‘डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरत असल्याने…” करोना मृत्यूंबाबत WHO ने व्यक्त केला ‘धडकी’ भरवणारा अंदाज

कोपनहेगन – कोविड-19 मुळे या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत केवळ युरोपात 2 वाख 30 हजार रुग्णांचा मृत्यू होण्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. लसीकरणाचा वेग खंडीत होण्याबाबत डब्लूएचओने चिंताह व्यक्त केली आहे. 

गेल्या आठवड्यात मृतांच्या संख्येत 11 टक्के वाढ झाली आहे. एका विश्वासार्ह अंदाजानुसार 1 डिसेंबर पर्यंत युरोपमध्ये 2 लाख 36 हजार मृत्यूंची शक्‍यता व्यक्त होत आहे, असे “डब्ल्यूएचओ’चे युरोपासाठीचे संचालक हॅन्स क्‍लुगे यांनी पत्रकारांना सांगितले.

युरोपमध्ये आजपर्यंत सुमारे 1 कोटी 3 लाख कोविड मृत्यूची नोंद झाली आहे. डब्लूएचओचे सदस्य असलेल्या 53 देशांपैकी 33 देशांमध्ये करोना मृत्यूचे प्रमाण गेल्या दोन आठवड्यात वेगाने वाढायला लागले आहे. करोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यातही काही देशांमध्ये लसीकरणाचा वेग अत्यंत संथ असल्याने तेथील करोनावृद्धीचा दर प्रमाणापेक्षा अधिक आहे.

डेल्टा व्हेरियंट अधिक वेगाने पसरत असल्यानेच करोनाची साथ वाढायला लागल्याचे क्‍लुगे यांनी मान्य केले. उन्हाळ्याच्या काळात सुटीचा आनंद घेण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रवास करण्यात आला होता. तसेच निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आल होती. त्यामुळेच हा संसर्ग वाढला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.