बर्िर्लन – करोना रोगाविषयीची माहिती जाहीर न करण्यासाठी चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणला होता त्यामुळेच ही संघटना या विषयी गप्प राहिली त्यांनी या रोगाला महामारी जाहींर करण्यासही विलंब केला असा जो आरोप अमेरिकेने आणि अन्य देशांनी केला आहे त्याचा जागतिक आरोग्य संघटनेने इन्कार केला आहे.
एका जर्मन मासिकाने या विषयीचे वृत्त दिले आहे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधनॉम घेब्रेयेसुस आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात 21 जानेवारी रोजी झालेल्या एका दूरध्वनी चर्चेचा संदर्भ देण्यात आला आहे. तथापी तो पूर्ण चुकीचा असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
करोनाचा एका मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे कशा प्रकारचा संसर्ग होतो याची माहिती जाहीर करू नये अशी सुचना चीनने या संघटनेला केली होती. तसेच करोनाचा आपत्ती ही महामारी जाहीर करण्यास जो विलंब झाला तोही चीनच्याच दबावामुळे झाला असाहीं आरोप केला जात आहे.
तथापी शी जिनपिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांमध्ये झालेल्या फोन वरील चर्चेत यापैकी कोणत्याहीं विषयाचा समावेश नव्हता असेही या संघटनेने म्हटले आहे. करोना हा संसर्ग जन्य रोग आहे हे चीनला कळले होते पण ते त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जाहीर करण्यास विलंब लावला असाहीं तक्रारदारांचा सूर आहे.
त्या विषयी या संघटनेने म्हटले आहे की करोना हा संसर्गजन्य रोग आहे हे वुहान मध्येच लक्षात आले होते पण त्याविषयी अधिक आधारभूत माहिती असणे गरजेचे असल्याने तो संसर्गजन्य रोग असल्याचे जाहीर करण्यास विलंब झाला असेही या संघटनेचे म्हणणे आहे.