शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद : अजित पवार

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नासंदर्भात निवेदन; न्याय देण्याची अपेक्षा

सातारा -प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद असून आचारसंहिता संपल्यानंतर विविध प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास दिल्याचे माहिती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी दिली. 

उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने कराडच्या वेणूताई सभागृहात अजितदादा पवार यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात चर्चा करून निवेदन दिले. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता मोफत गणवेश योजना राबविणे, मागासवर्गीय मुलींचे उपस्थिती भत्त्यात वाढ करणे.

अथवा ही योजना बंद करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना डिजिटल करण्यासाठी स्वतंत्र अनुदान मिळणे, शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे, शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे, नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलीविषयक धोरणांवर साकल्पाने चर्चा करून सर्वसमावेशक बदली धोरण लागू करणे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

याप्रसंगी बाबासाहेब लाड, शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव, अरुण पाटील, संजय नागरे, संचालक सुभाष शेवाळे, विनायक चव्हाण, अंकुश नागरे, मोहनराव सातपुते,
शशिकांत तोडकर, विष्णुपंत रोकडे, राजेंद्र लोहार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षक समितीच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात
आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.