पेव्हिंग ब्लॉकचे काम अपूर्ण

पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा गलथान कारभार
पारनेर – शासकीय कामाचे अनेकदा काम पूर्ण होण्यापूर्वीच बिले काढली जातात. याचा प्रत्यय पारनेरमधील कन्हेर ओहळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर बसवण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकचे काम पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराने बील काढल्याची माहिती समोर आली आहे.

पारनेर शहरातील कन्हेर ओहळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर पंचायत समिती बांधकाम विभागामार्फत पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले होते. मात्र काम पूर्ण न होताच मार्च महिन्यात त्याचे बिल वर्ग करण्यात आले. कामाचे बिल काढून पाच महिने झाले. मात्र ठेकेदाराने अद्यापही काम अपूर्ण ठेवले आहे.

याबाबत पंचायत समिती बांधकाम विभाग अधिकारी आहेर यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्या कामाचे बिल काढल्याचे समजले. काम पूर्ण झाले नाही तर बिल कसे वर्ग करण्यात आले? याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विचारणा केली. पेव्हिंग ब्लॉक हे पावसामुळे निघाले आहेत, तर काही फुटले आहेत. हे काम तत्काळ पूर्व करा व संबंधित अधिकाऱ्यासह ठेकेदाराची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित विभाग काम पूर्ण झाले असे म्हणत असले तरी, वस्तुस्थिती अशी आहे की, पेव्हिंग ब्लॉक बसविल्यानंतर त्याला लॉकपट्टी सिमेंट टाकून करावी लागते. मात्र पट्टी करण्यात आली नाही. तसेच त्यामुळे अनेक ब्लॉक मोकळे होऊन बाहेर निघाले आहेत. काम अपूर्ण असताना संबंधित ठेकेदाराला बिल अदा कसे केले?

भाऊसाहेब खेडेकर सामाजिक कार्यकर्ते 

Leave A Reply

Your email address will not be published.