शिरूर : पुणे – नगर या रस्त्याचे यापुर्वी काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी मार्फत करण्यात येणार होते. त्या बाबतचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु आता हे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या मार्फत करणार असून याबाबतचा करारनामा झाल्याचे माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर जनता दल से. प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी या विभागाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची मुंबई येथे भेट घेऊन सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली. पुणे – नगर चार पदरी रोड असून या रोडवर मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे.
या रोडवर रांजणगाव आंतराष्ट्रीय दर्जाची औद्वयोगिक वसाहत आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहनाची प्रचंड वाहतूकीची प्रचंड कोंडी होत असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत चालु करावे याची मागणी शेवाळे यांनी केली.तसेच नगर जिल्ह्यातील सूपा हे औद्योगिक वसाहत ही या रस्त्यावर आहे. यामुळे मराठवाडा व विदर्भकडे जाणाऱ्या रस्ता महामंडळाकडे हस्तांतरण झाल्यावर लवकरात लवकर चालू करू असे आश्वासन दीक्षित यांनी दिले आहे.