गुळवे मैदानातील जलकुंभाचे काम प्रगतीपथावर

नगरसेविका बारसे यांनी प्रत्यक्ष पाहणीत ठेकेदाराला सुनावले खडेबोल

चऱ्होली – भोसरी येथील गवळीनगरमधील गुळवे मैदानातील पाण्याच्या टाकी बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या वेळी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

नगरसेविका बोरसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी कामावर सुरक्षारक्षक नसल्याचे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी अभियंता लाडे यांना जागा ठेकेदाराच्या ताब्यात देऊन सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना देत संबंधित ठेकेदारास खडे बोल सुनावत करामासंदर्भात कुठल्याही प्रकारची दिरंगाई व हलगर्जीपणा तसेच लहान मुले, महिलांना विनाकारण आतमध्ये येऊन बसण्यास, खेळण्यास प्रतिबंध घालून पुढे जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी तुमची राहील असे सांगितले.

आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गवळीनगर प्रभागात गुळवे मैदान येथे टाकीचे बांधकाम नुकतेच सुरू झाले असून येत्या दोन वर्षांत टाकीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 20 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी प्रभाग क्रमांक पाचसाठी जीवनदायिनी म्हणजेच वरदहस्त आशीर्वादच ठरणार आहे.

कारण कमी प्रेशर व पुरेसा पाणीपुरवठा नागरिकांना होत नाही. लोकसंख्या वाढल्याने येथे पाणी कमी पडते. त्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक पाच मधील ही पाण्याची टाकी लोकांसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे, असे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.