कापूरहोळ -भोर आणि वेल्हा तालुक्यातील करोनाचे संकट थोपवण्याचे काम प्रशासन उत्कृष्ट करीत आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी नसरापूर (ता. भोर) येथील आढावा बैठकीत व्यक्त केले.
यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, तहसीलदार अजित पाटील, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी नीलेश तनपुरे, विशाल शिंदे, डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, डॉ. आंबादास देवकर, डॉ. बामणे, भोर नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी विजयकुमार थोरात, पोलीस अधिकारी विनायक वेताळ, राजू मोरे, विनायक देवकर, जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, रेवणनाथ दारवटकर उपस्थित होते.