बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा श्रीगणेशा

महापौर बंगल्याच्या जागेचे ताबापत्र व करारनामा उद्धव ठाकरेंकडे सुपुर्द

मुंबई (प्रतिनिधी) – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रीगणेशा झाला. महापौर बंगल्यातील हॉलमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या भव्य तसबिरीसमोर गणेशपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी महापौर बंगल्याच्या जागेचे ताबापत्र आणि करारनामा स्मारक न्यासाचे अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. सुमारे अडीच हजार चौरस फुटांच्या या बंगल्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेला चुचकारण्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या स्मारकासाठी 100 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून भाजपाने शिवसेनेला खुश केले आहे. त्यानंतर आज स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचे हस्तांतरण “बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती’कडे करण्यात आले.

यावेळी स्मारक समितीचे सदस्य सचिव शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, रश्‍मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते, सुधीर जोशी, ऍड. लीलाधर डाके, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, भाजपाच्या खासदार पुनम महाजन, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपनेते खासदार अरविंद सावंत, उपनेत्या आमदार नीलम गोछहे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अर्जुन खोतकर यांच्यासह खासदार, आमदार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)