पुणे:शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या निधनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य, नाट्यक्षेत्राशी संबंधित असणारे अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) November 15, 2021
पुरंदरें कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. अनेक वर्षे स्वतःच्या अनोख्या शैलीमध्ये त्यांनी इतिहास लिहिला तो घराघरात पोहचवला. बाबा साहेब गेल्यामुळे मोठी पोकळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये कायम राहिल. त्यांनी केलेलं काम अनेक पिढ्यांमध्ये जिवंत राहील.असे त्यांनी म्हटले आहे.