नवी दिल्ली – महिलांची युवा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा (17 वर्षांखालील) भारतातच होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. ही स्पर्धाच नव्हे तर फुटसाल स्पर्धा देखील भारतातच होईल, असे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने जाहीर केले आहे.
ही स्पर्धा यंदा 2 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत होणार होती. मात्र, करोनाचा धोका असल्याने त्यात बदल करण्यात आला आहे. आता नव्या कार्यक्रमानुसार ही स्पर्धा 2021 साली 17 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे. फुटबॉलच्या तीन विश्वचषक स्पर्धा यंदा आयोजित केल्या जाणार होत्या. कोस्टा रिका, पनामा व भारतात यातील एक स्पर्धा होणार आहे तर, फुटसाल स्पर्धा लिथुआनियात होणार आहे.