नवी दिल्ली- दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या महिन्याभरापासून हे आंदोलन सुरु आहे. परंतु आद्यपही ब्रृजभूषणसिंग यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कोणतीही कारवाई केली नाही. 29 मे रोजी भारताच्या नवीन संसदेचे उदघाटन झाले.
याच दिवशी आंदोलनकर्त्या खेळाडूंनी नवीन संसद भवनाच्या आवारात महिला पंचायत भरवण्याचा प्रयन्त केला होता. परंतु पोलीसांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली. मात्र,सत्ताधारी भाजपने या आंदोलनाची अजूनही दखल घेतली नाही. इतकचं नव्हेतर भाजप नेते आंदोलनाच्या मुद्यापासून पळ काढताना दिसून आले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महिला पहलवानों के मुद्दे पर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी ने दी तीखी प्रतिक्रिया
आप खुद देखें 👇 pic.twitter.com/9XqyJcwmgD
— Congress (@INCIndia) May 30, 2023
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचा हा व्हिडीओ असून या व्हिडिओमध्ये एक पत्रकाराने मीनाक्षी यांना ‘तुम्ही महिला खासदार आहात, तुम्ही कुस्तीपटूंचे आंदोलन या विषयावर गप्प का आहात? पंतप्रधान गप्प का आहेत? असा प्रश्न विचारला यावर मीनाक्षी यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. ‘चलो चलो चलो…’ असे म्हणत गाडीकडे पळ काढला आहे.
दरम्यान, मीनाक्षी लेखी या केंद्रीय मंत्री असताना आणि त्याहीपेक्षा एक महिला मंत्री असताना अशा संवेदनशील विषयावर त्यांची प्रतिक्रिया पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असून नागरिकांकडून मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जातोय.