वॉशिंग्टन, दि. 27- अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील रहिवासी असलेल्या 43 वर्षीय महिलेला अग्निशमन दलाने एका नाल्यातून वाचवले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला पोहायला गेली होती आणि त्यावेळी ती गायब झाली होती.
फ्लोरिडामध्ये राहणारी महिला लिन्डसी कॅनेडी 20 दिवसांपासून बेपत्ता होती. मंगळवारी अग्निशमन दलाने तिला नाल्याच्या बाहेर काढले. ती महिला 20 दिवसांपासून गटारात भटकत होती. बरेच प्रयत्न करूनही ती बाहेर पडण्यास अपयशी ठरली.
डेलीमेलच्या अहवालानुसार, ही महिला 3 मार्च मार्च रोजी कालव्यात पोहण्यासाठी गेली होती, परंतु काही अंतर पोहल्यानंतर तिला एक बोगद्याचा दरवाजा दिसला, ज्या आत गेल्यानंतर ती हरवली. बरेच प्रयत्न करूनही तिला बाहेर पडण्याचा रस्ताच सापडत नव्हता. पण 23 मार्च रोजी एका ठिकाणी प्रकाश आत येताना दिसला.
ती खूश होऊन त्या प्रकाश पडणाऱ्या जागेवर आली. परंतु, ती कित्येक फूट खोलीत होती. ज्यामुळे अनेक प्रयत्न करुन देखील तिला बाहेर येणे शक्य झाले नाही. शेवटी तिने जोर जोरात आरडा ओरडा सुरु केला. तिने तेथून एका व्यक्तीला जाताना पाहिले, नंतर तिने आणखी जोरात ओरडून त्या व्यक्तीचे लक्ष स्वत:कडे केंन्द्रीत केले.