एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर: जमिन विकण्यास हरकत घेणाऱ्या पत्नीस शिवीगाळ करून तिच्या हातावर चाकुने वार करून तिला जखमी केले. ही घटना विळद घाट येथील इंजिनिअरींग कॉलेजवळ शनिवारी (दि.11) रात्री 8 वाजता घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सुवर्णा सुभाष सानप (रा.विळदघाट, इंजिनिअरींग कॉलेजवळ) या घरी असताना त्यांचा पती सतीष बाजीराव सानप हा त्यांना म्हणाला की, मी माझी जमीन विकणार आहे, तु मध्ये पडू नकोस, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणून शिवीगाळ केली. आणि हातातील चाकुने पत्नी सुवर्णा हिच्या मनगटावर चाकुने वार करुन मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेन व तुझ्या आईवडीलांचे नाव घेईल अशी धमकी दिली. यामध्ये सुवर्णा ही जखमी झाली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी सुवर्णा सानप यांच्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ.शिवनाथ बडे हे करीत आहेत.