बंगळुरु – झोमॅटो ऍपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला होता. पोलिसांनी त्या डिलीव्हरी बॉयला अटक केली असून झोमॅटोने त्याला कामावरुन देखील हटवले. कामराज असे त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे नाव आहे. मात्र त्याने याप्रकरणी वेगळाच दावा केला आहे. ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाल्याने सबंधित महिलेने शिवीगाळ करत चप्पलने मारहाण केल्याचा दावा डिलीव्हरी बॉयने केला आहे.
डिलीव्हरी बॉयने एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी हितेशाशी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांना कळाले की तिने शहर सोडलं आहे. पोलिसांनी हितेशाशी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांना कळाले की तिने शहर सोडलं आहे.
एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी हितेशा चंद्राणीची चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यासाठी तिला फोन केला तेव्हा आपण शहर सोडल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. सध्या ती महाराष्ट्रात तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली आहे.
दरम्यान, डिलीव्हरी बॉयने या घटनेबाबत सांगितले आहे की, त्या महिलेच्या घरी पोहोचून ऑर्डर दिली आणि पैसे मिळण्याची वाट पाहत होतो. संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता. ऑर्डर पोहोचवण्यासाठी उशीर झाल्याने त्या महिलेची माफी मागितली होती तरी त्या रागावलेल्या होत्या. ट्रॅफिक जास्त असल्याने आणि रस्ता खराब असल्याने पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगितले.
मात्र महिलेने पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता आणि त्या झोमॅटो चॅट सपोर्टशी बोलत होत्या. नंतर त्या महिलेने झोमॅटो सपोर्टशी बोलताना ऑर्डर रद्द केली. ऑर्डर रद्द केल्यानंतर ती परत देण्यास नकार दिला. यांनतर बिल्डींगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास त्या महिलेने चप्पलने मारहाण केली आणि स्वत:च्या अंगठीनं नाकावर मारुन घेत जखम करूप घेतली असा दावा कामराजने केला आहे. त्याने एका पोर्टलशी बोलताना आपली बाजू मांडली आहे.