नवी दिल्ली : देशातील बहुतांश सेलिब्रेटी किंवा दिग्गज लोक सोशल मीडियावर आहेत. रतन टाटा यांनीही नुकतेच इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. अनेकदा ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर चर्चेतही राहिले आहे. रतन टाटांच्या फोटोवर एका महिलेने ‘छोटू’ अशी कमेंट दिली. यावरून नेटकऱ्यांनी त्या महिलेला चांगलेच ट्रोल केले.
रतन टाटांचे इंस्टाग्रामवर १० लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स झाले आहेत. यानिमित्त त्यांनी एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. हे एक अद्भुत ऑनलाइन कुटुंब आहे, यात सामील होताना मी हा विचार केला नव्हता. यासाठी मी आपणा सर्वांचे आभार मानतो, या व्यासपीठावर मला बरेच काही शिकायला मिळते आहे, अशी पोस्ट रतन यांनी लिहिली आहे.
रतन टाटा यांच्या फोटोवर एका महिलेने अभिनंदन छोटू अशी कमेंट केली. यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, रतन टाटांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत आपल्या सर्वांमध्ये एक लहान मूल आहे. आपण या महिलेचा आदर केला पाहिजे, असे म्हंटले आहे. नेटकऱ्यांनी रतन टाटांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, गुजरातमधील सूरत येथे 28 डिसेंबर 1937 रोजी जन्म झालेले रतन टाटा आज वर्षांचे आहेत. रतन टाटा यांनी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं.