मुंबई – पोलिस हे आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करतात. कोरोना काळात पोलिसांनी उल्लेखनीय कार्य केले. मात्र याच पोलिस बांधवांना अनेकवेळा नागरिकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. मुंबईतील काळबादेवी परिसरात एका महिलेने वाहतूक पोलीसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मारहाण करणारी महिला आणि तिच्यासोबतच्या एकाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील काळबादेवी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. आरोपी महिला पोलिसाचा शर्ट पकडून त्यांना मारहाण करत होती. तू अपशब्द कुणाबद्दल वापरतोस? असं म्हणत आरोपी महिला त्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना व्हिडीओत दिसत आहे.
Mumbai: Two persons, including a woman who was seen thrashing a police personnel on duty & misbehaving with him on Kalbadevi Road in a viral video, have been arrested.
The woman has alleged that the police personnel had abused her.
(Image – screengrab from viral video) pic.twitter.com/ENWGxBqxiA
— ANI (@ANI) October 24, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, काळबादेवी परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीसाने वाहतूकिच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिलेवर कारवाई केली होती. यामुळे संतापलेल्या महिलेने पोलिसावर हात उगारला. पोलीस कर्माऱ्याने तिच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली असा आरोप महिलेने केला आहे.
महिलेने पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत त्या महिलेविरूद्ध तात्काळ कारवाई करावी असे म्हटले आहे. ” या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी. मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे..” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी.
मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे..
Take Action..@AnilDeshmukhNCP @vishwasnp @PoliceMumbai100 https://t.co/aRfTOVzQDi— Sanjay Raut (@rautsanjay61) October 24, 2020