बारामती: बारामती तालुक्यातल्या क-हावागज मध्ये अज्ञात वन्य प्राण्यांने जनावरे अाणि माणसांवर हल्ला करत चावा घेतलाय. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी अाणि रेस्क्यू टिम क-हावागज परिसरात दाखल झालीय..
आज कन्हेरी भागात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला एका ऊसाच्या फडात बिबट्यासारखी दिसणारी तीन पिल्ले सापडली ही बातमी वाऱ्यागत कण्हेरी परिसरात पसरली, बिबट्याची पिल्ले पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली मात्र ती बिबट्याच्या पिल्ले नसून ती रानमांजरे असल्याचे स्पष्ट झाले..
बारामती तालुक्यातल्या काटेवाडी, कन्हेरी, ढेकळवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातलाय.. त्यातच जिरायती भागात वन्यप्राण्यांची दहशत पहायला मिळतेय.. रविवारी रात्री या वन्यप्राण्याने क-हावागज मधील लष्करवस्तीवरील सहा जनावरांना चावा घेतलाय तसेच सोमनाथ गावडे अाणि सर्जेराव नाळे यांना देखील चावा घेतलाय.. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाच्या अधिकारी अाणि रेस्क्यू टिमने या प्राण्यांच्या ठशांवरून हा हल्ला लांडग्याने केला असल्याच सांगितलय..
आज कन्हेरी भागात रेस्क्यू टीमला एका ऊसाच्या फडात बिबट्याच्या दिसणारी तीन पिल्ले सापडली ही बातमी वाऱ्यागत कण्हेरी परिसरात पसरली मात्र ती बिबट्याच्या पिल्ले नसून रानमांजराची असल्याचे स्पष्ट झाले आहे..