पीएमसी बँकेतु पैसे काढण्याची मर्यादा वाढली

मुंबई: रिझर्व बँकने महाराष्ट्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटीव बँक (पीएमसी) कर्ज वाटपात अनियमिततेनंतर काही निर्बंध लावले आहे. यात अंतर्गत खातेदारांना आपल्या खात्यातून केवळ १ हजार रुपये काढण्याची मर्यादा घालून दिली होती. परंतु आता हि मर्यादा वाढवून १० हजार रुपये करण्यात आली आहे.

थकीत कर्जात चुकीची माहिती आणि कर्जवाटपातील गैरव्यवहारामुळे या बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रिझर्व बँकेने ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मर्यादा वाढवली असून, आता १० हजार काढता येणार आहेत. तसेच ज्यांनी या पूर्वी १ हजार रुपये काढले आहेत, त्यांना आणखी नऊ हजार काढता येणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here