पाटलांच्या बाजुने सुज्ञ नागरिकांचा कौल

नीरा-भीमाचे संचालक अशोक वणवे यांचा विश्‍वास

रेडा- इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना तालुक्‍यातून सर्वच गावांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असून तालुक्‍याच्या विकासासाठी सुज्ञ नागरिकांकडून पाटलांच्या बाजुने स्पष्ट कौल दिसत आहे, असा विश्‍वास नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक वणवे यांनी व्यक्‍तकेला.

भिगवन-मदनवाडी रेल्वे स्टेशन तसेच भादलवाडी, कुंभारगाव परिसरातील मतदारांशी नीरा-भीमाचे संचालक वणवे यांनी संवाद साधला. यावेळी वणवेबोलत होते. ते म्हणाले की, तालुक्‍यात भाजपचा आमदार आला तरी अधिक निधी मिळणार आहे. भाजपच्या माध्यमातून तालुका अधिक सक्षम करण्याकरीता यशस्वी पावले उचलली जात आहेत. रस्ते, वीज आणि पाणी या गोष्टी प्राधान्याने सोडविण्यासाठी पक्ष सज्ज असून तालुक्‍याच्या पाण्याची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतली आहे.

विकासाची गती भाजप सरकार वाढवीत आहे. पाटील निवडून येणार असल्याने त्यांच्या माध्यमातून तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंदापूर तालुक्‍याला हक्‍काचे पाणी मिळावे यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी कायमच लढा दिला आहे. आता, भाजपची ताकद त्यांच्यामागे उभी राहणार असल्याने केवळ पाण्याचाच नव्हे, तर तालुक्‍यातील सर्वच मुलभुत प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मंत्रीमंडळातच पाटील यांना स्थान मिळणार असल्याने तालुक्‍यातील अनेक प्रश्‍न तातडीने मार्गी लागतील, असे विश्‍वास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच व्यक्‍त केला आहे. याबाबी लक्षात घेता तालुक्‍यातील सुज्ञ नागरीक पाटील यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे वणवे यांनी सांगितले.

  • युवा मतदार पाटील यांच्यासोबत…
    इंदापूर तालुक्‍यातील नव मतदार असलेले युवक मोठ्या संख्येने भाजपकडे आकर्षित झाले आहेत. तसेच, महायुतीच्या मित्रपक्षांनी हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली असल्याने युवा वर्गाचा पाठींबा पाटील यांना मिळत असल्याचे तसेच असंख्य युवकांच्या संघटनांनी पाटील यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केल्याचे अशोकराव वणवे यांनी सांगितले.
  • महायुतीचे स्टार प्रचारक आज इंदापुरात
    इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी बावडा येथे शनिवारी (दि. 19) स्टार प्रचारकांची तोफ धडाडणार आहे. यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्‍यातील सर्व मतदारांनी सांगता प्रचार सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रचारप्रमुख ऍड. कृष्णाजी यादव व इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.