ऍडव्होकेट्स बार असोसिएशनकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने विविध कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ क्रिकेट स्पर्धेने झाला. या वेळी वकिलांच्या बी टीमने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन ऍड. विजय शिंदे यांचे हस्ते झाले.
त्या वेळी ऍड. संजय दातीर पाटील, ऍड. अनिल तेजवाणी, ऍड. विलास कुटे, ऍड. राजेश पुणेकर, ऍड. सुनील कडूसकर, ऍड. अतिश लांडगे, ऍड. बाळासाहेब रणपिसे, ऍड. गोरखनाथ झोळ, सॉलिसिटर विकास पोटघन, ऍड. योगेश थांबा, ऍड. मुकुंद ओव्हाळ, ऍड. अमित डांगे, ऍड. नचिकेत देवकर, ऍड. चेतन जोशी, ऍड. योगेश, ऍड. गौरव वाळुंज, ऍड. तुषार नवले, ऍड. प्रताप कडूस, ऍड. अनिल शिंदे, ऍड. कुलदीप बकाल, ऍड. महेश टेमगीरे, ऍड. गोरख कुंभार, ऍड. प्रतीक जगताप, ऍड. योगेश मलेवडी, ऍड. नितीन शिंदे, ऍड. कैलास भालेकर उपस्थित होते.
या स्पर्धेकरिता एकूण चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी बी टीमने क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सर्वांनी क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी उपाध्यक्ष ऍड. अतुल अडसरे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना सचिव ऍड. हर्षद नढे पाटील यांनी आणि इतर वकिलांनी मोलाची साथ दिली. तसेच सदस्य ऍड. अनिल पवार व ऍड. विश्वेश्वर काळजे, ऍड. राजेश रणपिसे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून स्पर्धेत रंगत आणली.