मेलबर्न : आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर आक्रमक फलंदाज डेव्हिड वाॅर्नर याचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथवर केवळ एका मताने मात करत वाॅर्नरने हा पुरस्कार मिळविला.
The winner of the Allan Border Medal is David Warner! #AusCricketAwards pic.twitter.com/fTavhS8trR
— cricket.com.au (@cricketcomau) February 10, 2020
चेंडू कुरतडल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी संपल्यावर वाॅर्नरने दिमाखात पुनरागमन केले. पुरस्कार स्विकारताना त्याला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
The winner of the Belinda Clark award is Ellyse Perry! #AusCricketAwards pic.twitter.com/XrkF4N0PWV
— cricket.com.au (@cricketcomau) February 10, 2020
वाॅर्नरला सर्वोत्तम क्रिकेटपटूचे अॅलन बोर्डर पदक मिळाले. हा गौरव मिळविण्याची त्याची ही तिसरी वेळ आहे. वाॅर्नरने याआधी २०१६ व २०१७ मध्येही हा पुरस्कार पटकावला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यात आॅस्ट्रेलियाची अव्वल महिला क्रिकेटपटू एलिस पेरीला बेलिंडा क्लार्क पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.