दिशा पटणी आपल्या फिटनेस आणि डान्स स्कीलसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या फिटनेसचे व्हिडिओ ती सतत सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिने अपलोड केलेल्या अलीकडच्या एका व्हिडिओमध्ये तिला जणू काही पंख फुटले आहेत अशा अविर्भावात ती नाचताना दिसत आहे.
View this post on Instagram
जिममध्ये व्यायाम करताना किड फ्रान्सिस्कोच्या गाण्यावर नाचतानाची एक स्टेप तिने या व्हिडिओत दाखवली आहे. कॅप्शनमध्ये “जर मला पंख असते तर…’ असे लिहिले आहे. तिची ही स्टेप कुंग फू मधील किकसारखी दिसते आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत चार लाख जणांनी लाईक केले आहे.
दिशा सध्या “एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये काम करते आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या “एक व्हिलन’चा हा सिक्वेल असणार आहे आणि त्यामध्ये तिच्याबरोबर जॉन अब्राहमही असणार आहे.