पिंपरी – फोन उचलला नाही म्हणून पत्नीला माहेरी जाऊन कंबरेच्या पट्टयाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना भोसरी येथे घडली. अक्षया गणेश जगताप (वय 30, रा. चऱ्होली) यांनी शनिवारी (दि. 2) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश दत्तात्रय जगताप याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी फिर्यादी अक्षया या रामनगर, भोसरी येथील आपल्या आईच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी पती गणेश याने त्यांना फोन केला. मात्र त्यांनी तो फोन उचलला नाही. तसेच इतर कौटुंबिक कारणावरून चिडलेल्या आरोपीने अक्षया यांना त्यांच्या माहेरी जाऊन कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून जबर जखमी केले. पोलीस हवालदार मुंडे तपास करीत आहेत.