सुशिक्षित बेरोजगार युवक भाजपाला धुळ चारणारच- धनंजय मुंडे

संग्रहित छायाचित्र...

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीड दौऱ्यावर असताना एका चहा स्टॉलवर भेट दिली. दरम्यान त्यांनी चहाचा आस्वाद घेत चहाचे चक्क २ हजार रुपये दिले. आणि भाजप सरकारला सडेतोड प्रश्न विचारले आहेत.

बीड शहरातील नितीन धुताडमल या युवकाने समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल. पी. एस. आय. परिक्षेत कमी मार्क मिळाल्याने थोडक्यात पद हुकले. दुसरीकडे कुठेही नोकरी मिळत नाही म्हणून हतबल होऊन त्याने बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर चहाची टपरी टाकली. यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. आज ‘पदवीधर’ टी स्टॉलला भेट दिली. चहाचा आस्वाद घेतला. त्याच्या हाताला चव आहे, पण बोलतांना जाणवले की त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक खंत आहे. चहा बनवून विकण्यासाठीच मी शिकलो का? हा प्रश्न त्याला सतावत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

नितीननं या टपरीचं नावही ‘पदवीधर’ ठेवून, युवकांना रोजगाराची खोटी आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारला एक चपराक दिली आहे. अशा हजारो पदवीधर युवकांना हतबल होण्याची वेळ या भाजपा सरकारमुळे आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये हेच बेरोजगार तरुण भाजपाला धूळ चारतील हे निश्चितअसल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.

https://www.facebook.com/DPMunde/videos/325600631419107/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)