पोखरी घाटातील धबधबा खळखळला

मंचर -आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगर उतारावरुन धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पोखरी घाटातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

पावसामुळे भीमाशंकर, निगडाळे, आहुपे, कोंढवळ, डिंभे धरण या परिसरातील वातावरण हिरवेगार झाले आहे. डोंगर उतारावरुन धबधबे कोसळू लागले आहेत. पश्‍चिम भागात चांगल्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. आदिवासी गावांमध्ये धरतीने हिरवे वस्त्र नेसल्याचा भास होत असून सर्वत्र डोंगर उतारावरील शेती हिरवीगार झाली आहे. सतत संततधार पडणारा पाऊस आणि या पावसामुळे खळाळणारे ओढे, नाले, डोंगरावरुन फेसाळत पडणारे धबधबे यामुळे निसर्गसौंदर्य खुलू लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.