पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चिखली जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत फ्लो मीटर बसविणे, पर्वती ते एसएनडीटी दरम्यानच्या 1200 मि. मी व्यासाच्या जलवाहीनीची गळती शोधणे तसेच आशा नगर येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला देण्यात येणाऱ्या पाण्याची लाईन मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात असल्याने महापालिकेकडून औंध, बोपोडी, खडाकी, आळंदी रस्ता,खराडी परिसराच्या काही भागातील पाणी येत्या गुरूवारी ( दि.23) पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद
चतुश्रुंगी टाकी परिसर :- औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय. टी. आय. रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिध्दार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय.सी.एस. कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन.
Govt Emp Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
चिखली जलशुद्धीकरण केंद्र :- गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती आळंदी रोड, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बर्माशेल झोपडपट्टी, पुणे एअर पोर्ट लोहगाव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, पाराशर सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बायपास रोड,