पाकिस्तानची कोंडी: पाकिस्तानात जाणारं भारताच्या हक्काचं पाणी थांबविणार – गडकरी

बाघपत : पुलवामा येथे पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेद्वारे घडवून आणण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. वारंवार इशारे देऊन देखील आपल्या कुरापती सुरूच ठेवणाऱ्या पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान बाघपत येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता भारत सरकार कशाप्रकारे पाकिस्तानला जाणारे भारताचे हक्काचे पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करण्यास सज्ज आहे याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका व्हिडिओद्वारे माहिती देत आहेत.

या व्हिडिओमध्ये भाषण करताना गडकरी सांगतात की, “भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारताच्या आणि पाकिस्तानच्या वाट्याला प्रत्येकी तीन नद्या आल्या. मात्र इतके वर्ष भारताच्या या हक्काच्या तीन नद्यांमधले पाणी विनाकारण पाकिस्तानला सोडलं जात होतं. परंतु आता या नद्यांवर सरकारद्वारे तीन प्रकल्प उभारण्यात येणार असून या नद्यांमधील पाणी यमुना नदीमध्ये वळविण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे आता यमुना नदीत पाण्याची कमतरता भासणार नाही.”

याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देखील ट्विट केले असून “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला जाणारे भारताच्या हक्काचे पाणी अडवण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे” असं ते ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.