ईस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कारकिर्दीच्या अनेक सुरस कथा समोर येत आहेत पंतप्रधान पदावर असताना इम्रान खान यांना त्यांनी जी महागडी घड्याळ भेट मिळाली होती ती घड्याळे विकून इमरान खान यांनी पैसे कमावल्याची माहिती आता उघड झाली आहे.
पाकिस्तानच्या कायद्याप्रमाणे पंतप्रधानांना किंवा राष्ट्राध्यक्षांना मिळालेल्या भेटी सरकारी खजिन्यात जमा कराव्या लागतात पण खान यांनी तसे न करता त्यांना पंतप्रधान म्हणून मिळालेल्या भेटी विकून पैसे मिळवल्याचा आरोप करण्यात येत आहे अतिशय महागडी अशी तीन घड्याळ विकून इमरान खान यांनी तीन कोटी 60 लाख रुपये कमावले बाजारपेठेत ह्या घड्याळांची किंमत पंधरा कोटी पेक्षा जास्त होती.
कायद्याप्रमाणे राष्ट्रप्रमुख यांना मिळालेल्या भेटी सरकारी खजिन्यात जमा कराव्या लागतात नंतर त्या भेटींचे मूल्य ठरवले जाते जर एखाद्या राष्ट्रप्रमुखला ती भेट हवी असेल तर त्या मुल्याच्या 50 टक्के रक्कम जमा करून तो ती वस्तू स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतो पण अशा प्रकारचे कोणतेही पैसे न भरता इम्रान खान यांनी ही घड्याळे ताब्यात घेतली आणि इतरांना विकून टाकली असे आता लक्षात आले आहे सौदी अरेबियाच्या राजपुत्राने इम्रान खान यांना एक सोन्याचे घड्याळ भेट दिले होते.
पण त्याची कोणतीही माहिती सरकारी खजिनाला न देता इमरान खान यांनी आपली पत्नी बुशराच्या माध्यमातून हे घड्याळ विकून टाकले सर्व घड्याळ इमरान खान यांनी स्थानिक घड्याळ विक्रेत्यालाच विकली आहेत इमरान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांना एकूण 58 भेटी मिळाल्या त्यापैकी अनेक भेटी त्यांनी सरकारी खजिन्यात अल्प रक्कम जमा करून स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि काही भेटीची माहिती सरकारी खजिन्याला न देता त्या स्वतःच्या ताब्यात ठेवला असे ही आता उघडकीस आले आहे पाकिस्तानचा विद्यमान सरकारवर इम्रान खान सध्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असतानाच त्यांच्या कारकीर्दीतील या गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत.