वारणा खोरे सौम्य भूकंपाने हादरले; कोणतीही जीवितहानी नाही

कोल्हापूर – वारणा खोरे आज रविवारी भूकंपाच्या धक्क्यांने हादरले. 5 वाजून 07 मिनिटांच्या सुमारास चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता 2.9 रिश्‍टर इतकी नोंदली गेली. वारणा पाटबंधारे शाखा अधिकाऱ्यांनी कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

हा धक्का अति सौम्य स्वरूपात असला तरी परिसरात जोरात शिवाय अधिक वेळ जाणवला. या भूकंपाची नोंद अस्पष्टपणे झाल्यामुळे या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे आहे हे समजू शकले नाही. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.