तर अफगाणिस्तानमधील युद्ध काही आठवड्यातच संपेल- अमेरिका

पाकिस्तानने तालिबानींना सुरक्षित आश्रय नाकारण्याची अपेक्षा

वॉशिंग्टन : जर पाकिस्तानने तालिबानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देण्यास नकार दिला, तर अफगाणिस्तानमधील युद्ध काही आठवड्यातच समाप्त होईल, असे अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटरने म्हटले आहे.

या संदर्भात ट्रम्प प्रशासनाने तालिबानी नेत्यांऐवजी पाकिस्तानबरोबर चर्चा करायला पाहिजे, अशी सूचनाही रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी केली आहे. तालिबानबरोबरची चर्चा अमेरिकेकडून शनिवारपासून कतार येथे पुन्हा सुरू केली जात असल्यच्या वृत्ताच्या पार्श्‍वभुमीवर त्यांनी ही सूचना केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी अध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानींबरोबरची चर्चा अचानक बंद केली होती. ही चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तानकडून सहाय्य केले जात होते.

तालिबानींबरोबर वर्षभर सुरू असलेली चर्चा निरर्थक ठरली होती. काबुलमध्ये अमेरिकेच्या एका सैनिकाच्या हत्येनंतर तालिबानींना चर्चेसाठी दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आले होते.

मुक्‍त व्यापार कराराने पाकिस्तानच्या वर्तनात बदल व्हायला पाहिजे. त्यानंतर तालिबानबरोबर चर्चा व्हायला हवी, असे ग्राहम यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांना तालिबानबरोबरचे दीर्घकाळ प्रलंबित युद्ध समाप्त करायचे आहे. या युद्धामध्ये अमेरिकेचे हजारो सैनिक मरण पावले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.