मुंबई – रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणचा “83′ कधी रिलीज केला जाणार आहे, याची तारिख अखेर निर्मात्यांनी जाहीर केली आहे. अक्षय कुमारचा “सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंहचा “83′ थिएटरमध्ये रिलीज केला जाणार नाही, असे काही दिवसांपूर्वी म्हटले गेले होते.
मात्र आता “83′ 4 जूनला थिएटरमध्ये रिलीज केला जाणार असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे, असे स्वतः रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये जाहीर केले आहे. त्याने या सिनेमाचे पोस्टर आणि रिलीजची तारिख देखील जाहीर केली आहे. “83′ 4 जून 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमध्ये “83′ रिलीज होणार आहे. भारताने 1983 साली जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची यशोगाथा “83′ मध्ये दाखवली गेलेली आहे. यापूर्वी “83′ गेल्या वर्षी 10 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज करण्याचे नियोजन होते.
मात्र करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रिलीज पुढे ढकलावा लागला होता. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याविषयी जोरदार चर्चाही झाली. मात्र सर्वसामान्य प्रेक्षकांना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील या ऐतिहासिक विजयाचा पुन्हा आनंद घेता यावा, म्हणून ओटीटी ऐवजी थिएटरमध्येच रिलीज करण्याचा निर्णयनिर्मात्यांनी घेतला आहे.