नवी दिल्ली – नोटबंदीच्या सहा वर्षांनंतरही बाजारातील चलनी नोटांचे प्रमाण कमी झाले नाही तर ते उलट वाढले असल्याचेच दिसून आल्याने नोटबंदीचा मुख्य हेतू साध्य झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटबंदीच्या काळात जितक्या चलनी नोटी बाजारात कार्यरत होत्या त्या तुलनेत सध्या बाजारातील चलनी नोटांचे प्रमाण 83 टक्क्यांनी वाढले असल्याचे आरबीआयच्या ताज्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
जगाच्या एक तृतीयांश भागाला बसणार मंदीचा तडाखा; पुढील 2-3 महिने चीनसाठी असतील खडतर
रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार,4 नोव्हेंबर 2016 रोजी देशात 17.74 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारात होत्या. याच नोटांचे प्रमाण 23 डिसेंबर 2022 रोजी 32.42 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. बाजारातील रोख नोटांचे प्रमाण करून डिजीटल व्यवहारांना चालना देणे हे नोटबंदीचे उद्दीष्ठ असल्याचे सरकारकडून सांगितले गेले होते.
काळापैसा उजेडात आणणे हेही या योजनेचे दुसरे लक्ष्य होते; पण तेही साध्य होऊ शकलेले नाही, असे बॅकांमध्ये जमा झालेल्या नोटांच्या प्रमाणावरूनही स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आकडेवारीनुसार नोटबंदी नंतर चलनात असलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या 99 टक्क्यांहून अधिक नोटा बॅंकांकडे जमा झाल्या आहेत.