आजपासून पाहता येतील देखावे

प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक देखावे
नगर – गणपती बापा मोरयाच्या तालावर बापाचं सोमवारी आगमन झालं. दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरातील गणेशोत्सव मंडळ भाविकांसाठी देखावे तयार करतात. या देखाव्यातून प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा गणेशोत्सव मंडळे प्रयत्न करतात.

दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ऐतिहासिक देखावा उभारणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव अतुल पिंजरकर यांनी दिली. शुक्रवार(दि.6)पासून हा देखावा भाविकांना बघता येईल. रावसाहेब पटवर्धन यांची प्रेरणेतून सुरू केलेल पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्ट गणेश मंडळ यावर्षीही सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने देखावा बनवत आहे.

यंदा पटवर्धन मंडळ आपण देशासाठी काय करतो, हा देखावा तयार करते. आजपासून हा देखावा पाहता येईल. माजी नगरसेवक किशोर डागवाले संस्थापक – अध्यक्ष असलेले शिववरद प्रतिष्ठान गणेश मंडळ तुळजापूरच्या तुळजाभवानीचा देखावा साकारत आहे, असं अध्यक्ष नितीन डागवाले यांनी सांगितल. नेताजी सुभाष तरुण मित्र प्रतिष्ठाण यंदा भवानी मातेच्या तलवारीचा देखावा करत आहे. सिध्देश्‍वर तरूण मंडळ (जंगुभाई तालिम) शिवराज्याचा अभिषेक हा ऐतिहासिक देखावा साकारला. यंदा मोहरम निमित्त देखावे नऊ तारखेपर्यंतच असणार आहेत.

73 वर्षाची परंपरा असलेलं चौपाटी कारंजा मित्र गणेशोत्सव मंडळ यंदा देखावा बनवत नसल्याचं मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारी यांनी सांगितलं. देखाव्यासाठी जो खर्च येतो, तो पैसा देखाव्यासाठी खर्च न करता पुरग्रस्त भागातील श्रीदत्त एज्युकेशन सोसायटी, नरसोवाडी (ता. शिरोळा, जि. कोल्हापूर) च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.