व्हिजिटिंग कार्डमुळे व्हायरल झाल्या ‘या’ मोलकरीणबाई

पुणे : आजकालच्या धावपळीच्या युगात एका महिला नोकरदाराला घरची कामं करून ऑफिसची कामं करण्यात चांगलीच दमछाक होते. त्यामुळे आजच्या घडीला बहुतांश घरामध्ये घरकाम करणारी व्यक्‍ती असतेच…अशीच एक घरकाम करणारी महिला सध्या सोशलमीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. तिचे हे व्हायरल होणे एका व्हिजिटींग कार्डमुळे झाले आहे.

धनश्री शिंदे या खासगी कंपनीत काम करतात…त्यांच्याकडे मागील दोन वर्षापासून गीता काळे घरकामाला आहेत. परंतु, गीता सध्या करत असलेल्या कामातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत नव्हता त्यामुळे त्यांची कामासाठी धावपळ होत होती. त्यांची ही धावपळ पाहून धनश्री यांनी पुढाकार घेत त्यांच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड तयार करून दिले. दरम्यान, हे कार्ड बावधनमधील वॉचमनकडे ठेवण्याची कल्पनादेखील त्यांनी दिली. एवढेच नाही तर धनश्री यांनी हे कार्ड त्यांच्या मैत्रिणींना शेअर केले तसेच व्हाट्‌सअपवरदेखील शेअर केले. धनश्रीने केलेल्या या कामामुळे गीता यांना एवढी मदत झाली की, एका दिवसात अडीच हजार कॉल्स आणि 1 हजार मेसेजस त्यांना आले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, गीता यांचे हे कार्ड पाहूण त्यांच्या जुन्या मालकाने देखील त्यांना कामावर बोलावले. याकार्डवर गीता यांच्या आधारकार्डसह त्यांच्या धुणी-भांडी, झाडू-पोछा, कपडे धुणे यासह घरातील सर्वच कामे करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, कार्ड छापण्याचा फायदा होणार हे माहिती होते पण एवढा त्याचा फायदा होणार हे आम्हाला वाटले नव्हते असे धनश्री यांनी म्हटले आहे. आता गीता यांना चांगल्या पगाराचे काम मिळाले असून हे सर्व एका व्हिजिटींग कार्डमुळे झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)