पश्चिम बंगालमध्ये सीपीएम उमेदवारावर हल्ला 

पश्चिम बंगाल- लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु झाले आहे. महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, मणिपुर आणि त्रिपुरा मधील ३४ जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर प्रचंड हिंसा होत आहे. दरम्यान, रायगंज येथील इस्लामपूरमध्ये सीपीएम उमेदवार मोहम्मद सलीम यांच्यावर जमावाने हल्ला केला असून, त्यांची गाडी सुद्धा फोडण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये मोहम्मद सलीम यांना कोणतीही इजा झाली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.