हाथरस – उत्तरप्रदेशात हाथरस येथे दलित मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा जो प्रकार घडला आहे त्या प्रकाराची सत्यता पडताळून पहाण्यासाठी तिच्या कुटुंबियांची नार्को टेस्ट करण्याचा आदेश उत्तरप्रदेश सरकारने दिला आहे.
तथापि अशा प्रकारची कोणतीही टेस्ट देण्यास पीडितेच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. पीडितेच्या आईने एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले आहे की आमच्यावर अशा चाचण्या घेण्यापेक्षा आमच्या मुलीवर ज्यांनी अत्याचार केले त्यांच्यावर या चाचण्या घेतल्या पाहिजेत.
आमच्यावर जबाब बदलण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव आल्याचेही या कुटुंबियांनी अनेक वाहिन्यांना सांगितले आहे.
याची सत्यता पडताळून पहाण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट केली जाणार असल्याचे उत्तरप्रदेश सरकारकडून सांगण्यात आले होते.