वाहन पलटी होऊन एक ठार; सहा जखमी

सातारा – मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत चारचाकी गाडी पलटीहून विलास राजाराम खरात (वय 52) (सध्या, रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले, तर इतर 6 जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, खरात कुटुंबीय मुंबई येथून भिलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे मुळगावी सुट्टी व यात्रेनिमित्त चारचाकी गाडीने येत असताना बुधवार दि. 1 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावर गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला बांधावर तीन ते चार पलट्या घेऊन पलटी झाली. यामध्ये विलास राजाराम खरात (वय 52, सध्या रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले.

जितेंद्र विलास खरात, संगीता विलास खरात, अंकिता विलास खरात, निकिता रोहन कांबळे, रोहन कांबळे व रुचिता रोहन कांबळे सर्व राहणार भिलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदर घटनेच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व घटना पंचनामा करण्यात आला असून, मृत विलास खरात यांचे मृतदेह शवविच्छेदन (कलेढोण, ता. खटाव) येथील कुटीर रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मृत विलास खरात याच्यावर अपघातास कारण ठरल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.