चलनातील नोटांचे मूल्य 21 लाख कोटींपर्यंत वाढले

नवी दिल्ली : आर्थिक व्यवहारात उपलब्ध असलेल्या चलनाचे मूल्य मार्च 2019 अखेर 21 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. आर्थिक वर्ष 2016-2018 च्या अखेरीस केवळ हे प्रमाण 13 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले होते, अशी माहिती आज संसदेत दिली गेली.

या वर्षी मार्च अखेरीपर्यंत 21,109 अब्ज रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारामध्ये उपलब्ध होत्या, असे अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. अगोदरच्या आर्थिक वर्ष 2017-1-18 मध्ये (मार्च 201 8 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात) चलनात असलेल्या नोटा 18,037 अब्ज रुपये मूल्य असलेल्या होत्या. 2016-17 अखेर ते प्रमाण 13,102 अब्ज रुपये इतके झाले होते. तर 31 मार्च 2016 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत व्यवहारात असलेल्या नोटांची किंमत 16,415 अब्ज रुपये इतकी होती, असेही ठाकूर यांनी सांगितले.

नोटाबंदीच्या पूर्वीच्या तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे प्रमाण नोटाबंदीनंतर वाढले आहे का, या प्रश्नाला ठाकूर उत्तर देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा उच्च किंमतीवर बंदी आणण्याची घोषणा केली होती. काळा पैसा आणि दहशतवाद्यांचे अर्थसहाय्य रोखणे तसेच डिजीटल व्यवहाराला चालना देण्याच्या उद्देशाने ही नोटबंदी करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.