पुणे – करोना प्रतिबंधक लस आता विकतच घ्यावी लागणार असल्याने ती साहजिकच काळजीपूर्वक हाताळली जाणार आहे. त्यामुळे वेस्टेजचे प्रमाण कमी होईल, असा दावा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
आजपर्यंत ज्या लस उपलब्ध झाल्या आहेत त्यातील 10 लाख लसींच्या डोसमागे एक लाख डोस म्हणजे 10 टक्के “वेस्टेज’ धरण्यात येत होते. तसेच लस देतानाही “व्हायल्स’ मध्ये शिल्लक राहिलेले (म्हणजे एकदा उघडलेले) पुन्हा दुसऱ्या दिवशी “रियुज’ करू शकत नाही. त्यामुळे ते वाया जातात. मात्र आता खासगी रुग्णालयांना लस विकत घ्यावी लागत असल्याने आणि ती हिशेबात “कट टू कट’ दिली जात आहे.
खासगी रुग्णालयांना एका लसीचे दीडशे रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय “युजर चार्जेस’ मिळून ते 250 रुपये आहेत. तेवढे पैसे वाया जाऊ शकणार असल्याने त्यांना ते काळजीपूर्वकच हाताळावी लागणार आहे.
केंद्राच्या निर्णयानुसार खासगी रुग्णालयांमध्ये त्यांना स्वत:चे कर्मचारी, लसटोचक ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांना “नो वेस्टेज’ च्या दृष्टीनेच त्यांना “ट्रेनिंग’ द्यावे लागणार आहे.